कल्याण-डोंबिवलीत परिवर्तनाचे वारे! प्रभाग १७ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना जनसामान्यांचा वाढता पाठिंबा
कल्याण-डोंबिवली:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा रणसंग्राम आता अधिकच तीव्र झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘काम करत आलोय, काम करत राहू’ हा मुख्य मंत्र घेऊन निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
प्रभाग क्रमांक १७ मधील चारही विभागांत पक्षाने आपले युवा निर्विवादित आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या चेहऱ्याला उम्मीद्वारी दिलेला असून, त्यांना मतदारानतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग १७ चे अधिकृत उमेदवार:
पक्षाने प्रभाग १७ च्या चारही जागांसाठी युवा स्वच्छ प्रतिमा आणि लोकांमध्य चांगला जनसंपर्क असलेल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे:
* प्रभाग क्र. १७ (अ): सौ. मोनिका किरण गायकर
* प्रभाग क्र. १७ (ब): सौ. आराध्या राजन दुबे (शिंदे)
* प्रभाग क्र. १७ (क): श्री. धनंजय सदाशिव गायकर
* प्रभाग क्र. १७ (ड): श्री. प्रजेश मदन पाटील
‘मशाल’ पेटली; विजयाचा निर्धार!
उमेदवारांच्या प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि जनसमर्थन पाहायला मिळत आहे. “आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवतो,” अशी भावना उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. बॅनरवरील ‘मशाल’ या चिन्हासमोर बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन केले जात आहे.
“जनतेचा विश्वास आणि मोठ्या जनसमर्थन हीच आमची ताकद आहे. प्रभाग १७ च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
निवडणुकीच्या या वातावरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पारडे जड दिसत असून, मतदारांचा कल कोणाकडे झुकतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
