Saturday, January 17, 2026
Latest:
राजकीय

प्रलोभनांना धुडकावून धनंजय गायकर निवडणूक मैदानात; कल्याण-डोंबिवलीत ‘निष्ठा’ विरुद्ध ‘सत्ता’ असा सामना

कल्याण:

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कथित भ्रष्ट नीतीमुळे २० पेक्षा अधिक नगरसेवक ‘बिनविरोध’ निवडून आल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कट्टर उमेदवारांनी या प्रलोभनांना भीक न घालता निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकला आहे.

महाराष्ट्राने बिहारलाही मागे टाकले! उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलीसांसमक्ष `साम-दाम-दंडा’चा वापर

कोटींच्या प्रलोभनांना नाकारले

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक उमेदवारांना निवडणूक रिंगणातून मागे हटण्यासाठी कोटींच्या घरांत प्रलोभने देण्यात आली होती. मात्र, पक्षाशी असलेली निष्ठा आणि जनतेप्रती असलेले कर्तव्य जपण्यासाठी ठाकरे गटाच्या अनेक खंद्या शिलेदारांनी हे प्रस्ताव फेटाळून लावले. यामध्ये प्रभाग क्रमांक १७ (क) चे उमेदवार श्री. धनंजय सदाशिव गायकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे.

सत्ता आणि पैशासाठी निष्ठा खुंटीवर’; भाजपच्याच माजी नगरसेवकाचा स्वकीयांवर ‘हाऊ ओके’ प्रहार

कड़ी टक्कर आणि वाढता पाठिंबा

धनंजय गायकर यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता भाजप-शिवसेना युतीच्या पॅनेलसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. प्रलोभनांना धुडकावून लावल्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर देण्यासाठी आता जनताच सरसावली असून, गायकर यांच्या ‘मशाल’ चिन्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

https://youtu.be/g7qUKUZzFFA?si=p3vkJFvywhZZLsl1

या निवडणुकीत धनंजय गायकर यांच्यासारखे निष्ठावान उमेदवार सत्ताधाऱ्यांच्या गणितांना सुरुंग लावणार का? याकडे संपूर्ण कल्याणचे लक्ष लागून राहिले आहे.

https://youtube.com/shorts/JsTzuTfi0Sg?si=4fxa46oipW8wpglB