डोंबिवलीत भाजपला खिंडार! फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून शेकडो तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश
डोंबिवली: राज्यातील सध्याच्या फोडाफोडीच्या आणि गढूळ राजकारणाला कंटाळून डोंबिवलीतील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला (भाजप) सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला आहे. आज रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी एका विशेष सोहळ्यात या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत पक्षात अधिकृत प्रवेश केला.

प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा
मनसे नेते व माजी आमदार राजू दादा पाटील, विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित साहेब ठाकरे आणि शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे यांच्या विशेष सहकार्याने या युवकांनी मनसेत येण्याचा निर्णय घेतला.
हलाल’च्या नावाखाली चालणारी समांतर व्यवस्था थांबवा! खासदार मेधा कुलकर्णी यांची थेट FSSAI कडे मागणी
प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते
यावेळी रिचा सत्यवान कामतेकर, यश कदम, प्रचिती कदम, स्वप्निल मुंडगेकर, उषा जाधव, सुवर्ण हडकर, तानाजी साळुंखे आणि स्वरूप वडवणकर यांसह शेकडो तरुणांनी व नागरिकांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले.
मनसे पदाधिकारी उपस्थिती
या पक्षप्रवेशावेळी मनसेचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने धनंजय गुरव (जिल्हाध्यक्ष, मविसे), मनोज घरत (शहराध्यक्ष, मनसे), दिप्तेश नाईक (उपजिल्हाध्यक्ष), प्रतीक देशपांडे (शहराध्यक्ष, मविसे), प्राजक्ता महेश देशपांडे (उपशहराध्यक्ष), गणेश कोकाटे, ओंकार आपटे, अमेय पंडित, निधीश नायर, निखिल जोशी, प्रसाद चोरगे, कुणाल मोरया यांसह महिला सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“राजसाहेबांची स्पष्ट भूमिका आणि विकासाचे राजकारण पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे. भविष्यात डोंबिवलीच्या विकासासाठी मनसेच्या माध्यमातून काम करू,” अशी भावना प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व नवीन कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून, या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीत मनसेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे बोलले जात आहे.
