साईबाबा मंदिराचा जिर्णोद्वार, मंदिरात राम सीता व लक्ष्मणाच्या मूर्तींची देखील प्रतिष्ठापना
{ बालकृष्ण मोरे )
कल्याण / न्यू गोविंद वाडी कचोरे येथील साई बाबा मंदिराचा जिर्णोद्वार करण्यात आला आहे.या बरोबरच या मंदिरात राम सीता व लक्ष्मणाच्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली.या जिर्णोद्वाराच्या कार्यक्रमाच्या वेळी येथे होम हवन पूजा करून या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या समयी आलेल्या भक्तांना भंडारा महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.याचा लाभ परिसरातील भक्तांनी घेतला.
समाज सेवक आतिष चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभागातील जेष्ठ नागरिकांना मोफत शिर्डीची यात्रा घडवली गेली होती.या बरोबर आतिष चौधरी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखील या जीर्णद्वार कार्यक्रमाच्या वेळेस घेण्यात आला या वेळी आतिष भोईर यांना शुभेच्छा देण्या साठी अनेक जण उपस्थित होते.
न्यू गोविद वाडी येथील साई बाबा मंदिर हे येथे संमिश्र असलेल्या जाती धर्माच्या लोकांच्या एकतेचे प्रतीक आहे. येथे सर्वच जाती धर्माचे लोक एकतेने राहत असून या मंदिरा मुळे येथे धार्मिक प्रसन्न वातावरण असते.या जिर्णोद्वार साठी येथील नगरसेविका रेखा राजन चौधरी, बजरंग दल उपजिल्हा प्रमुख राजन चौधरी,उधोगपती हरीश शर्मा,आरती ग्रुप कंपनीच्या आरती शर्मा, समाजसेवक आतिष चौधरी, रवी गुप्ता, प्रदीप गायकवाड आदींनी परिश्रम घेतले