श्री राधाकृष्ण मंडळाचा वर्धापन दिन साजरा.
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.२२ – समाजाचा विकास हाच आमचा ध्यास असे ब्रीदवाक्य उराशी बाळगुण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणा-या उरण तालुक्यातील सारडे गावातील श्री राधाकृष्ण शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक मंडळाचा 17 वा वर्धापण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वर्धापन दीना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रा. जि. प. शाळा सारडे च्या सर्व विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वाटप, तर स्वर्गीय किशोर गुरु म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आशा चंद्रकांत पाटील वशेणी यांच्याकडून पिरकोन हायस्कूलच्या इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात ऊल्लेखनीय यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सत्कारमूर्ती सर्वेश मिन्नाथ पाटील, सुयोग गंगाधर पाटील, विशाखा चंद्रकांत पाटील, प्रतीक्षा हिराचंद पाटील, ए. डी. पाटील त्याचबरोबर सारडे शाळेत ज्या शिक्षकांनी सेवा केली.
अशा सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. रात्रौ 9.30 ला मनोरंजनात्मक कार्यक्रम ‘आशेचा किरण’ सादर करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सारडे ग्रामपंचायत सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी भूषविले. सारडे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्यामकांत पाटील, सदस्य समीर पाटील, भार्गव म्हात्रे, भारती पाटील, क्षमा पाटील, भगवती पाटील, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, मंडळाचे अध्यक्ष एस के पाटिल,उपाध्यक्ष एम एस पाटिल, सचीव संदीप पाटील, खजिनदार वैजनाथ म्हात्रे आणि मंडळाचे सदस्य ए.डी. पाटील, विलास पाटील, रविंद्र पाटील, मनोहर सर, जी आर म्हात्रे, सी. डी. पाटील, भारती पाटील, मधुकर पाटील, सदानंद पाटील आदि मान्यवर तसेच शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक, हितचिंतक आणि गावातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होतें. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे माजी अध्यक्ष विलास पाटील, आभार प्रदर्शन सी. डी.पाटिल तर प्रास्ताविक मनोहर पाटील यांनी केले.