* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> वाहतुक कोंडी व अपघात संदर्भात अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका. – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

वाहतुक कोंडी व अपघात संदर्भात अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका.

उरण दि.२२ – उरण तालुक्यात दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतो दररोज एक तरी व्यक्तिचा मृत्यु निश्चित आहे. असे असताना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी अपघात होवु नये म्हणून तसेच जर अपघात झालाच तर त्वरित करावयाच्या उपाययोजनांची वानवा,अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर सुडबुद्धिने पोलिस प्रशासनाकडून दाखल होणारे गुन्हें,राजकीय इच्छाशक्तिचा अभाव, उरण मध्ये ट्रेलर, अवजड वाहनांमुळे होणारी दैनंदिन वाहतुक कोंडी, सर्विस रोडचा अभाव,सुसज्ज हॉस्पिटलचा अभाव,अवैध पार्किंग, CSF व गोडाउन मालकांची पार्किंग संदर्भात अरेरावी या सर्व समस्यांमुळे उरणमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दररोज उरणचे स्थानिक नागरिक किंवा त्यांचे कुटुंबीय बळी ठरत आहेत.या सर्व समस्यावर उरण सामाजिक संस्था व विविध सामाजिक संस्था अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून जनतेला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत मात्र अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा अपघात, वाहतुक कोंडी तसेच उरण मधील विविध समस्या संदर्भात शासन व्यवस्थित लक्ष देत नसल्याने येथील जनता न्यायापासून खूपच दूर आहे.जाणून बुजुन जनतेच्या या महत्वाच्या समस्यांकडे महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उरण मधील विविध सामाजिक संघटना यामध्ये आम्ही पिरकोनकर समूह, आम्ही पाणदिवेकर, उरण सामाजिक संस्था, आम्ही कडापेकर,सारडे विकास मंच, कोप्रोली स्वच्छता अभियान,सचिन मेमोरियल फाऊंडेशन,फ्रेंड्स ऑफ नेचर, चिरनेर, गोल्डन जुबली मित्र मंडळ सारडे,मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे,स्वराज्य मित्रमंडळ रांजनपाडा, आम्ही गोवठणेकर,पुनाडे विकास मंच, उरण क्रिकेट समालोचक असो, स्वराज्य ग्रुप खोपटे आदि उरण मधील विविध सामाजिक संघटनाच्या एकत्रित प्रयत्नाने श्री दत्त मंदिर पानदिवे, पूर्व विभाग,उरण येथे दि 21/5/2019 रोजी रात्री 8 वाजता अपघात व वाहतुक कोंडी संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निष्क्रिय शासन यंत्रणा व पोलिस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांचा सामाजिक संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.

उरणमध्ये एखादा अपघात झाला की जी व्यक्ति त्या अपघातग्रस्तांना मदत करते त्यांच्यावर पोलिस प्रशासनातर्फे गुन्हें दाखल केले जातात. ज्या व्यक्ति अपघातग्रस्तांना मदत करतात अश्या सामाजिक पदाधिकारी-कार्यर्त्यांवर गुन्हें दाखल होतात त्यांची फाईल बनविली जाते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रकार सुरु होतो.असे प्रकार उरण मध्ये नेहमी पहावयास मिळतात. एकतर महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासन अपघात समयी योग्य वेळेवर पोहोचत नाही.शिवाय अपघातग्रस्तांना योग्य न्याय देऊ शकत नाही. उलट त्या अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या व्यक्तिंवर वेगवेगळे गुन्हें दाखल करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातो.जेणे करून त्या व्यक्तीने पुन्हा कधी कोणाची मदत करु नये अश्या प्रकारे त्रास पोलिस प्रशासनाकडून दिला जातो. त्यामुळे पोलिस प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या कामगिरीवर त्यांच्या कारभारावर येथील जनता आक्रमक झाली असून आता शासन आणि पोलिस प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेवून विविध सामाजिक संघटना एकत्र येवून एक नवीन संघटना स्थापन करनार असून त्यात उरण मधील सर्व सामाजिक संघटनांचा समावेश असेल. या संघटनेच्या माध्यमातून अपघात, वाहतुक कोंडी, अवैध पार्किंग या विरोधात आवाज उठविला जाणार आहे. लवकरच या संदर्भात दुसऱ्या मीटिंगचे आयोजन केले जाणार असल्याचे बैठकीमध्ये निश्चित झाले आहे.

उरणमध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्याकडे शासन यंत्रणा,पोलिस प्रशासन तसेच लोक प्रतिनिधि, राजकीय पुढा-यांचेही अक्षम्य दुर्लक्ष होत असून उरण मधील विविध समस्या सोडविण्यास हे सर्व अपयशी ठरत आहेत. अपघातग्रस्तांचे जीव वाचावेत यासाठी यासाठी एकहि सुसज्ज असे शासकीय हॉस्पिटल नाही. अपघातग्रस्त व्यक्तिंना वेळेवर एम्बुलेन्स भेटत नाही, अपघातावरिल उपचारासाठी नेहमी वाशी, पनवेल नवी मुंबई मधील हॉस्पिटल गाठावे लागते. आर्थिक परिस्थिति नसताना देखील भरमसाठ बिल अपघातग्रस्तांवर लादले जाते, शिवाय मानसिक त्रास वेगळाच.उरण मधील आरोग्य सेवांचे तीन तेरा वाजले आहेत, कोणत्याही उच्च शिक्षणाची सोय नाही. भौतिक सुविधांची वानवा आहे. रस्ते वीज पाणी, दळनावळणाच्या सुविधा आदि संदर्भात  नागरिकांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.हे वर्षानुवर्ष असेच चालत आल्याने, यावर कोणत्याही प्रकारे तोडगा निघत नसल्याने याबाबत विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी चिंता व्यक्त केली आहे. काहीतरी आगळे वेगळे करण्याचा संकल्प करत उरण मधील सामाजिक संघटना दि 21/5/2019 रोजी रात्री 8 वाजता श्री दत्त मंदिर पानदिवे येथे एकत्र आले. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी जि.प.सदस्य कुंदाताई ठाकुर, जि.प.सदस्य बाजीराव परदेशी, माजी जि.प.सदस्य जीवन गावंड, माजी जि.प.सदस्य वैजनाथ ठाकुर, कांग्रेस प्रणीत पर्यावरण व संरक्षण उरण पनवेल विभागाचे अध्यक्ष अजित म्हात्रे, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गौरव म्हात्रे, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,जयवंत पाटिल यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरची चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही पिरकोनकरचे चेतन गावंड,प्रांजल पाटील, आम्ही पाणदिवेकरचे अमित पाटील  परेश पाटील आणि आम्ही उरण क्रिकेट समालोचक संघटनेचे सुनील वर्तक यांनी खूप मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *