भारतीय इंजिनीअरची हत्या करणा-याला जन्मठेप
भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचिभोतला यांची हत्या करणाऱ्या अमेरिकन नौदल सैनिकाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अॅडम डब्ल्यु पुरिंटन असे या मारेकऱ्याचे नाव आहे.दोन वर्षांपूर्वी २ वर्षांपूर्वी २२ फेब्रुवारी रोजी वंशभेदावरून कुचिभोतला यांची हत्या करण्यात आली होती.
आमच्या देशातून बाहेर व्हा’ म्हणत यु.एस. नेव्हीच्या माजी सैनिकाने भारतीय इंजिनिअर आणि त्याच्या मित्रांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हैदराबादचा श्रीनिवास कुचिभोतला दुर्दैवी मृत्यू झाला होता. या वर्णद्वेषातून झालेल्या हल्याने संपूर्ण जग हादरले होते. कारण हा वर्णद्वेषी हल्ला डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर एका महिन्यातच झाला होता.
अॅडम डब्ल्यु पुरिंटन असे या ५२ वर्षीय मारेकऱ्याचे नाव आहे.या हल्यानंतरतील अमेरिकीतील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी निकाल देताना कन्सास फेडरल कोर्टाने माजी नेव्ही अधिकाऱ्याला दोशी असेल्याचे घोषित केले आणि या खून प्रकरणी त्याला जन्मठेपेची जास्तीजास्त शिक्षा सुनावली.
श्रीनिवास आपल्या मित्रासोबत ओलाथे शहरातील एका बारमध्ये होते. तेथे अॅडमने केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, तर मित्र आलोक मदसानी जखमी झाला होता. त्यांच्या मध्ये पडलेले आणखी एक नागरित इयान ग्रिलट हेदेखील जखमी झाले होते. याचवर्षी मार्च महिन्यात अॅडम पुरिंटनने कंसास कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यावेळी शिक्षेच्या सुनावणीसाठी कोर्टाने ४ मे ही तारीख दिली होती. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाली होती, पण तेव्हा पुरिंटन स्वत:ला निर्दोष म्हणवत होता.