बोलण्यात गुंतवून ६० हजारचे दागिने लुबाडले
श्रीराम कांदु
ठाणे-बोलण्यात गुंतवून ठेवून एका ज्येष्ठ नागारिकाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच ठाणे येथे घड्लीय.याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपत देशमुख हे जेष्ठ नागरिक नौपाडा रोड येथील मॅकडोनाल्ड येथे गेले होते.यावेळी दोन अनोळखी व्यक्तिनी आम्ही तुमच्या भाच्याला ओळखतो अशी बतावणी करत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले.आणि त्यांच्या गळयातिल २५ ग्राम ची सोनसाखळी व अंगठी असा ६० हजार रुपयांचा ऐवज काढून घेवून ते पसार झाले.या प्रकारणी गणपत देशमुख यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळगे पुढील तापस करत आहेत.