* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> डोंबिवलीतील ‘हास्यदर्शन ‘प्रदर्शनात नामवंत कलाकारांची व्यंगचित्रे  – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

डोंबिवलीतील ‘हास्यदर्शन ‘प्रदर्शनात नामवंत कलाकारांची व्यंगचित्रे 

डोंबिवली – शिवसंस्कृती व कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 9 ते 11 मार्च पर्यंत आनंद बालभवन ,रामनगर डोंबिवली पूर्व येथे नामवंत व्यंगचित्रकाराची “हास्यचित्रे”प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून शिवसेना प्रमुख व जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी 6 व्या दशकात काढलेली दुर्मिळ व्यंगचित्रे पहाता येणार आहेत  त्याच प्रमाणे मंगेश तेंडुलकर ,शी द फडणवीस ,वसंत सरवटे, विवेक मेहेत्रे गणेश जोशी, प्रशात कुलकर्णी आदी नामवंत कलाकारांची व्यगचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. महापौर राजेंद्र देवळेकर याचे हस्ते 9 तारखेला सकाळी 11 वाजता उद्घाटन करण्यात येणार असून स्थायी समितीचे सभापती राहुल दामले आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *