डोंबिवलीत घरफोडी,1लाख 38 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले
डोंबिवली- डोंबिवली पुर्वेकडील सावरकर रोड हिमछाया सोसायटी मध्ये राहणारे जनार्धन पवार हे काल सकाली आपल्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी भर दिवसा त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटमधील 1लाख 38 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले सायंकाळी कामावरून घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह दाखल करत तपास सुरू केला आहे .