घराचा पत्रा तुटल्याच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

खडकपाडा पोलीस स्थानकात परस्पर विरोधी गुन्हे दाखल  

कल्याण –  घराच्या छतावरील सिमेंट चा पत्रा तुटल्याने जाब विचारण्यास गेले असता दोन कुटुंबात तुफान धुम्श्क्री झाली .या मारहाणीत दोन्ही कुटुंबाचे सदस्य गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांनी तक्रार नोंदवल्या असून या तक्रारी नुसार पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत .

       कल्याण वडवली मोहने येथे राहणारे संदीप पाटील यांच्या घराचा पत्रा तुटल्याने संदीप यांनी त्यांचे काका हरिचंद्र पाटील यांना जाब विचार्त तुम्हीच पत्रा तोडला असे सांगत शिवीगाळ केली त्यामुळे संतापलेल्या हरीचंद्र पाटील आणि त्यांचा भाऊ देवराम पाटील ,आशिष शैलेश ,जितेश व त्याच्या साथीदारांनी संदीप पाटील याना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली तसेच प्रदीप पाटील यांना देखील बेदम मारहाण केली या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार हरिचंद्र पाटील ,देवराम पाटील ,आशिष पाटील ,शैलेश पाटील ,जितेश पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे .तर हरिचंद्र यांचा भाऊ देवराम पाटील यांनी देखील या प्रकरणी संदीप पाटील व प्रदीप पाटील यांनि पुन्हा घरासमोर शिवीगाळ करत आपल्याला मारहाण केल्याबाबत खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी संदीप पाटील व प्रदीप पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.