कल्याण बोगदा येथल खुनामागील गुढ लवकरच उलगडणार कोळसेवाडी पोलिसांचा दावा
कल्याण रेल्वेस्थानकातून कोळसेवाडीकडे जाताना हा बोगदा लागतो. या परिसरात छोटी-छोटी दुकाने असल्याने सायंकाळपर्यंत या ठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे प्रवासी या बोगद्यातून ये-जा करत असतात. रात्री मात्र या ठिकाणी गर्दुल्यांचा वावर असतो. बोगद्यात लाइटही नसल्याने अनेकदा हे गर्दुल्ले बोगद्यात अंधारात ठाण मांडून असतात. काल मध्यरात्री विनोद नेहमी प्रमाणे उरण येथील कंपनीतून घरी परतत होता. विनोद नेहमी कंपनीच्या बसने कल्याण पूर्वेला तिसगाव नाक्यावर उतरून घरी जात असतो. मात्र काल दुर्देवाने तो कल्याण पूर्वेला उतरण्याऐवजी पचिमेला उतरला आणि बोगद्यातून चालत जात असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. त्याचे डोके बोगद्याच्या भिंतीवर जोरजोरात आपटण्यात आले. त्यामुळे डोक्याला जबर मार लागून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
कल्याण रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेने बाहेर पडतांना लागणाऱ्या बोगद्यात काल रात्री विनोद सुर्वे नामक युवकाची हत्या करणाऱ्या दोन संशयीतांना पोलिसांनी २४ तासांचे आत छ्डा लावून ताब्यात घेतले असून या खूना मागील गुढ लवकरच समजेल असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले .