नरेन्द्र मोदी तुम्हाला आवडोत, अगर न आवडोत, पण त्यांचा माणसांचा अभ्यास कोणीच नाकारू शकत नाही!!

स्वान्नंद गंगल यांच्या फेसबुख वॉल वरुण

कुठल्याही वक्त्यासाठी समोरच्या श्रोत्यांची पूर्ण माहिती असणे आणि त्यानुसार त्यांच्यावर सहज पकड बनवणे अत्यंत गरजेचे असत. नरेंद्र मोदी ज्या कोणत्या गुणांमुळे एक नेता म्हणून इतरांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात त्यातला हा एक अत्यंत महत्वाचा गुण!! मध्यंतरी ते Exam Warriors कार्यक्रमात प्रश्नांना उत्तरे देत होते. समोर Teenagers विद्यार्थी आणि त्यांचे पालक होते. मोदींनी एका आईच्या प्रश्नाला अगदी सहज प्रतिप्रश्न केला, “ये PUBG वाला है क्या??” nया एका वाक्यातच ते त्या विद्यार्थ्यांना आवडून गेले कारण हा साठी ओलांडलेला माणूस त्यांच्या आवडीच्या खेळाबद्दल बोलला होता. ते Cinema Museum च्या उद्घाटनाला गेले तेव्हा समोर बसलेल्या चित्रपट क्षेत्रातील लोकांशी बोलता बोलता.

हेही वाचा :- 30 वर्षांतरच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आयुक्तांचे आदेश

त्यांनी विचारलं “How’s The Josh” कारण त्याच दरम्यान Uri चित्रपट बॉक्सऑफीसवर धमाका करत होता. बाहूबली आला होता तेव्हा ते जनसभांमधे बाहूबलीचे उदाहरण देऊन बोलले होते. आज India TV वर ते मुलाखत देत होते आणि राहूल गांधींबद्दल बोलताना त्यांनी सध्या गाजत असलेल्या Avengers चित्रपटाचा आणि त्यात दाखवलेलेल्या  इतर वेगवेगळ्या ग्रहांवरील प्राण्यांचा उल्लेख करत उत्तर दिले. हि खरंच एक कला आहे आणि मोदी यात प्रचंड तरबेज आहेत!! मोदी तुम्हाला आवडोत अगर न आवडोत पण त्यांचा माणसांचा अभ्यास कोणीच नाकारू शकत नाही!!

#MasterModi, #IndiaTV, #माणसेवाचणारामाणूस

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email