डोंबिवलीत काही भागात झेरॉक्स दरात दुप्पट वाढ

डोंबिवली दि.१२ – झेरॉक्स हे सर्वांसाठी आवश्यक बाब असून याच्या दरवाढ झाल्याने डोंबिवलीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे डोंबिवली पश्चिमेला एक प्रत १ रुपये असा दर असताना डोंबिवली पूर्वेकडे मात्र एक प्रत २ रुपये असे दर आकारले जात आहे. झेरॉक्स ही सर्व सामान्य नागरिक ,विद्यार्थी याची गरज बनली आहे. मात्र डोंबिवली पूर्वच्या काही भागात आता १ रुपये असणारे झेरॉक्सचे दर अचानक २ रुपये करण्यात आले आहेत मात्र ज्यांना ४००/५०० प्रति झेरॉक्स हव्या असतात त्यांनी झेरॉक्स पेक्षा छापील प्रत स्वस्त असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पश्चिम डोंबिवली ,एम आय डी सी ,कल्याण या भागात १ रुपये प्रत असाच झेरॉक्सचा दर आहे. डोंबिवलीत सुमारे१५० ते २०० ते झेरॉक्स दुकाने आहेत.

हेही वाचा :- “दीपस्तंभ प्रकल्प आव्हान” गृहबांधणी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवणार राज्यांना या प्रकल्पांसाठी केंद्राचे सहाय्य लाभणार

झेरॉक्स मशीनची किंमत २ लाख रुपये होती, ती ७ लाख झाली आहे. तर कागदाचे दर १४० वरून १८५ रुपये पर्यंत पोहोचले आहेत. या सदर्भात कस्तुरी प्लाझा येथील स्वामी समर्थचे अंकुश वेखंडे यांना विचारले असता ते म्हणाले, गेली २५ वर्षे ७५ पैसे दर होता व गेली काही वर्षे १ रुपया दर होता कागद ,मशीन ,विजेचे बिल ,जागेचे भाडे या सर्वाचे दर वाढल्याने गेली अनेक वर्षे 1 रुपया असलेला दर आम्हाला 2 रुपये करणे भाग पडले आहे मात्र पहिल्या ५० प्रति झेरॉक्सला आम्ही २ रु. आकार घेतो व नंतर मात्र १ रुपये दर घेत असल्याचा दावा त्यांनी केला ,सर्वत्र महागाई वाढली असताना झेरॉक्स दर वाढल्यामुळे ओरड केली जाते या बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली .झेरॉक्स दुकानदारांची कोणतीही संघटना नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email