लेखिका विनीता नंदा यांनी ‘मीटू’ मोहिमअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

लेखिका विनीता नंदा यांनी ‘मीटू’ मोहिमअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलोकनाथ यांनी १९ वर्षांपूर्वी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप नंदा यांनी केला आहे. ‘मीटू’ अंतर्गत लावण्यात आलेले सर्व आरोप आलोकनाथ यांनी फेटाळून लावले होते.

हेही वाचा :- कल्याण ; घरासमोर घाण पाणी टाकल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेस लाकडी दांडक्याने मारहाण

२५ ऑक्टोबरला आलोकनाथ यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. नंदा यांच्या मागोमाग अभिनेत्री संध्या मृदुल आणि दीपिका आमीन यांनीही आलोकनाथ यांच्यावर ‘मीटू’ अंतर्गत गैरवर्तन केल्याचे आरोप लावले आहेत. आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७६ अंतर्गत लेखिका विनीता नंदा यांनी एफआयआर नोंदवली असून आलोकनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिस अतिरिक्त आयुक्त मनोज शर्मा यांनी स्पष्ट केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email