वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली

नवी दिल्ली, दि.२९ – नीती आयोगाने, संयुक्त राष्ट्रसंघाच्या भागीदारी पुरस्कारासाठीच्या नामनिर्देशनाची मुदत 31 जुलै 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. नीती आयोगाने संयुक्त राष्ट्रसंघ आणि डीआयसीई डिस्ट्रिक्ट यांच्या समवेत या पुरस्कारासाठी नामांकने मागविली आहे.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी या डब्ल्यूटीआय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्याची प्रशंसा करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

यावर्षीच्या पुरस्कारासाठी “महिला आणि उद्योजकता” यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

फक्त भारतीय नागरीकच या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. एखादी व्यक्ती स्वत: किंवा एखाद्या व्यक्तीच्या वतीने https://www.wep.gov.in/wti-awards या संकेतस्थळावर अर्ज दाखल करु शकते अथवा 91-704264887 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email