डोंबिवली ; महिलांची छेड काढणाऱ्या नराधमाला महिलांची बेदम चोप ; live Video

डोंबिवली दि.१५ – महिलेची छेड काढणाऱ्या भामट्याला काही महिलांनी अद्दल घडवत चोप दिला. तुषार बनसोडे असं त्या नराधमचे नाव असून तो डोंबिवलीतील सहागाव परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे. तुषार हा डोंबिवलीतील नांदिवली टेकडी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेची गेल्या ४ महिन्यापासून छेड व अश्लील शेरेबाजी करून तिला त्रास देत होता. पीडित महिला ही मोलकरीण असल्याने ती त्रास सहन करीत होती. याचाच फायदा घेत या भामट्याने काही दिवसापूर्वीच तिला भररस्त्यात गाठून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पीडिताने कुटुंबाला व ती ज्या ठिकाणी घरकाम करण्यासाठी जाते तेथील मालकिणीला सांगितली होती. त्यानंतर पीडित महिलेचे कुटुंब तुषारला जाब विचारण्यासाठी गेले असता, त्याने उलट त्यांनाच धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा :- डोंबिवली ; भंगार विक्रेत्याला लुबाडले

तुषारने सोमवारी पुन्हा पीडित विवाहितेशी भर रस्त्यात लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी असलेल्या काही महिला तिच्या मदतीला धावून आल्या. तुषारला जाब विचारला असता त्याने याही महिलांसोबत अरेरावी केली. यामुळे या महिलांनी चप्पला काढून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून चोप देणाऱ्या महिलांनी पीडित महिलेची माफी मागायला त्याला भाग पाडले. हा प्रकार १० ते १५ मिनिटे सुरू होता. त्यावेळी कोणीतरी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, महिलांनी या तुषारची चप्पलेने चोप देत त्याची धिंड काढण्यात आली होती.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email