‘महारेल’तर्फे तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण पुणे-गोव्याच्या दिशेचा प्रवास अधिक वेगवान
मुंबई दि.०६ :- महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात ‘महारेल’ने तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाचे (तुर्भे आरओबी) रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ब्राह्मण महासंघातर्फे कोतकर शाळेला टेबल टेनिस टेबल, अन्य साहित्य प्रदान
सध्या पुलावरून ये-जा करण्यासाठी प्रत्येकी तीन मार्ग उपलब्ध आहेत. रुंदीकरणात पुलाच्या दोन्ही दिशेला अतिरिक्त दोन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. यामुळे तुर्भे रेल्वे उड्डाणपुलावरून पुणे-गोव्याच्या दिशेने अधिक वेगाने प्रवास करता येणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात चार महिन्यांत ३८ गुन्हे दाखल, ५३ आरोपींना अटक
रेल्वे उड्डाणपुलाची लांबी १६०० मीटर असून मार्गिकांच्या स्लॅब आणि रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. पाचपैकी तीन जोडरस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. तयार मार्गिकांवर स्टीलच्या कमानी उभारण्याचे काम सुरू असून सध्या अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. जुलैअखेर तुर्भे पुलाच्या नव्या मार्गिका प्रवासासाठी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.