कल्याण का भाई कौन? हातात तलवार घेऊन तरुणांचा धिंगाणा

 

हातात तलवार, कोयते अशी शस्त्र घेऊन रस्त्यावर दहशत पसरवणं, तलवारीने केक कापणं अशा गोष्टी हल्ली तरुणाईमध्ये सर्रास पाहिला मिळतायत. परिसरात आपली दहशत पसवरण्याचा यामागे या तरुणांचा उद्देश असतो. पण हाच उद्देश महागही पडू शकतो.

कल्याणमध्ये असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कल्याण पूर्व परिसरातील सिद्धार्थ नगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन तरुण हातात तलवार घेत भर रस्त्यात दहशत पसरवत होते.

या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं होतं. दोन महिन्यांपूर्वी याच तरुणांनी एकाला मारहाणही केली होती. त्यानंतर आता पुन्हा या तरुणांनी हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.