चोळे येथील चार गुंठे जमिन महिला कल्याण केंद्रासाठी आरक्षित असताना शासनाचा ताबा

डोंबिवली दि.२१ – डोंबिवली जवळील चोळे येथील चार गुंठे जमिन कल्याण डोंबिवली महापालिकेने महिला केंद्रासाठी आरक्षित ठेवलेली असताना ती जमिन नगर भूमापन करताना शासनाच्या नावाचा विचार करण्यात आला. यामुळे ही जमिन महापालिकेच्या नावावर करुन ती जमिन महिला केंद्रासाठी देण्याची मागणी होत आहे. शिवसेनेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र लिहून वरील मागणी केली आहे. चोळे येथील चार गुंठे जमिन कल्याण डोंबिवलीच्या नावावर असताना तो भूमिअभिलेख यांनी सरकारी जागेची मोजणी करुन शासनाच्या नावे ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :- पारसिक रेल्वे स्टेशनला चालना मिळणार, खा.सुुप्रिया सुळेंनी केली वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा

विकास आराखडयात आरक्षण क्रमांक सदर १०४ क्रमांकाचा भूखंड महिला कल्याण केंद्रासाठी राखीव करण्यात आला आहे याकडे त्यानी लक्ष वेधले आहे.या भूखंडावर महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून हा भूखंड मिळावा यासाठी महिला संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र प्रशासन दाद देण्यास तयार नाही अखेर महिलांचे श्ष्टिमंडळ कविता गांवंड यांच्या नेतृत्वाखाली खा डॉ. श्रीकांत शिंदे यांना भेटले व त्याचे याकडे लक्ष वेधले. यामुळे खा. डॉ. शिंदे यानी जिल्हाधिकार्याना पत्र लिहून महिला केंद्रासाठी राखीव असलेली जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याची विनंती केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email