डॉक्टरने महिलेचे सिझर करताना बँडेजची पट्टी पोटाच राहिली…महिलेचा मृत्यू

डॉक्टरने महिलेचे सिझर करताना बँडेजची पट्टी पोटाच राहिली…महिलेचा मृत्यू…बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बुलढाण्यात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसुती झाल्यानंतर काही दिवसांनी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका महिलेचं प्रसुती दरम्यान सिझर करत असताना डॉक्टराकडून बँडेज पट्टी पोटात राहिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कवठळ इथं राहणारे परमेश्वर पाखरे यांची पत्नी पूजा पाखरेला गरोदर होती. 7 एप्रिल रोजी प्रसूती कळा जाणवू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी सिझर केले. पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

परंतु सिझर झाल्यानंतर पूजाच्या पोटात अचानक दुखायला लागले. पाच दिवस ती रुग्णालयातच होती. पण पोट दुखणे काही थांबले नाही. पोट दुखणे थांबत नसल्यामुळे पूजाला पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले होते. 19 तारखेला पूजावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून तिला सुट्टी देण्यात आली आणि ती घरी आली. पण, पुन्हा पोटात दुखायला लागले.

त्यामुळे परमेश्वर यांनी पुन्हा 10 जून रोजी खामगाव येथील खासगी रुग्णालयात पत्नीला रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी करून तपासणी केली असता पोटात बँडेजची पट्टी असल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून पोटातील बँडेज बाहेर काढण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा पूजाचा त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे पुन्ह बुलडाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्रसुतीदरम्यान, बँडेज पोटात राहिल्यामुळेच पूजाचा मृत्यू झाला असा आरोप करत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी पाखरे कुटुंबीयांनी केली आहे.

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email