कुर्ती बदलण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये गेली अन् दागिन्यांची चोरी केली; डोंबिवलीतील शिक्षिकेला अटक

 

डोंबिवली शहरात एका खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षिकेने मैत्रिणीच्या घरातील कपाटात ठेवलेल्या तीन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केला.

मात्र, पोलिसांनी त्या चोरट्या शिक्षिकेचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या आहे. अमिषा नीमेश अशेर वय, ३८ असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे.

डोंबिवलीतील टिळकनगर भागातील मातृश्रध्दा सोसायटीमधील चौथ्या मजल्यावर कविता सागर गुधाटे वय, ४१ ह्या कुटूंबासह राहतात. तर आरोपी अमिषा ही शिक्षिका असून डोंबिवलीतील जिजाईनगर भागातील दीप्ती नवल सोसायटीत राहते.

ह्या दोघी मैत्रिणी असल्याने दोघीचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे आहे. त्यातच आरोपी शिक्षिका ही २७ सप्टेंबर रोजी कुर्ता बदलण्याच्या बहाण्याने सकाळी सात वाजता कविता गुधाटे यांच्या घरी आली होती.

त्यावेळी बेडरूममध्ये कुर्ता बदलत असताना तिने तक्रारदार कविता यांच्या घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, झुमका, सोनसाखळी चोरुन पोबारा केला.

त्यानंतर कविता गुधाटे यांनी काही कामानिमित्ताने कपाट उघडले असता त्यांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दुसरीकडे आपण घरात असताना, चोरीची कोणतीही लक्षणे दिसत नसताना दागिने गेले कोठे असा प्रश्न कविता यांना पडल्यानंतर शिक्षिका अमिषा हिनेच ही चोरी केली असण्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला.

आरोपी शिक्षिका आमिषाचा शोध घेऊन तिला डोंबिवलीतून अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.