फुलांनी सजलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण स्थानकावर जोरदार स्वागत

डोंबिवली दि.२३ – मध्य रेल्वेवरील पहिल्या निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला सुरुवात झाली. शिवाजी टर्मिनस स्थानकावरून सुटलेली गाडी थेट कल्याण रेल्वे स्थानकावर थांबली. यावेळी उपस्थित शिवसैनिक व नागरिकांनी जोरदार घोषणा देऊन स्वागत केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्रेनचे मोटरमन आणि इतर कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. घोषणांनी कल्याण दणाणून गेले. विशेष म्हणजे सेना-भाजपचे कार्यकर्ते एकजुटीने सहभागी झाले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, खासदार व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वेवर सुरु झाली आहे.

हेही वाचा :- टिटवाळा पोलिसांची हुक्का पार्लरवर धडक कारवाई

यामंध्ये भिवंडीचे खासदार कपिल पाटील व भाजपा कार्यकर्त्यांचाही वाटा आहे. सर्व लोकप्रतिनिधी मिळून कल्याण व भिवंडी लोकसेवा मतदार संघात अनेक कामे झाली आहेत. दिवा व ठाकुर्ली या दोन्ही रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला. अनेक उपनगरी गाड्या वाढविण्यात आल्या. मध्य रेल्वेने मुंबई नंतर राजधानीला कल्याणला थांबा दिला याचा अभिमान वाटतो. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर आमदार बालाजी किणीकर, महापौर विनिता राणे, उपमहापौर अपेक्षा भोईर, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, विजय (बंडू) साळवी, शरद पाटील, श्रेयस समेळे, दशरथ घाडीगावकर, विजया पोटे तसेच भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.