आसाममधील मंदिरांच्या पुजार्‍यांना 15 हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णयाचे स्वागत !

Hits: 0

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी यातून बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कोरोनामुळे बाधित झालेल्या राज्यातील हिंदु पुजारी आणि नामघरांना (छोट्या मंदिरांना) 15 हजार रुपयांचा कोरोना साहाय्य निधी देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असून हिंदु जनजागृती समिती त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करते. यापूर्वीही धार्मिक स्थळांच्या 5 कि.मी. परिसरात मांस विक्रीला बंदी घालण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. अशा प्रकारच्या निर्णयांतून अन्य राज्यांनी बोध घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्षे सर्वच ठप्प झाल्यासारखे आहे. अनेकांचे रोजगार गेले. सर्व क्षेत्रांतील उत्पन्न घटले आहे. त्यात मंदिरांचाही समावेश आहे. कोरोनामुळे मंदिरात येणार्‍या भाविकांचे प्रमाण खूप कमी झाल्याने मंदिराचे उत्पन्न अत्यल्प झाले आहे. त्यामुळे अनेक मंदिरांतील पुजार्‍यांना कमी करावे लागले आहे. परिणामी मंदिरावर अवलंबून असलेल्या पुजार्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी पुजार्‍यांना 15 हजार रुपयांचे साहाय्य केल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्रातील मंदिरांसाठी कोरोना काळात अशा प्रकारे साहाय्य करण्याची मागणी केली होती.

केवळ अल्पसंख्यांकांच्या नावाखाली देशातील अनेक राज्यांतील मदरसे आणि मशीद यांमध्ये काम करणार्‍या इमाम, मौलवी, अजान देणारे आदींना दर महिन्याला विविध राज्यांच्या सरकारकडून आर्थिक साहाय्य दिले जात आहे; पण तसे साहाय्य बहुसंख्यांक हिंदु पुजार्‍यांना वा मंदिरांना कोणत्या सरकारने केल्याचे समोर आलेले नाही. याउलट हिंदूंच्या बहुतांश श्रीमंत आणि मोठ्या मंदिरांचे सरकारीकरण करून तेथील संपत्ती लुटण्याचे काम विविध राज्य शासनांनी केले आहे. अशा वेळी मंदिरातील पुजार्‍यांना आणि नामघरांना अनुदान देण्याचा निर्णय बहुसंख्यांकांच्या भावनांचा आदर करणारा आहे. या निर्णयाच्या धर्तीवर अन्य राज्य सरकारांनी मंदिराना आणि तेथील पुजार्‍यांना साहाय्य करण्याचा निर्णय घ्यावा, अशी समितीची भूमिका आहे.

आपला नम्र,
श्री. शंभू गवारे,
पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक,
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्र.: 90110 88535)

Leave a Reply

Your email address will not be published.