बॉलिवूडचे यंदाचे सर्वात मोठे लग्न…आज पती-पत्नी बनणार रणवीर-दीपिका!!

आज १४ आणि उद्या १५ नोव्हेंबरला दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आज लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका आणि रणवीर सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आज लग्नबंधनात अडकणार आहे. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे हे रॉयल वेडिंग पार पडणार आहे. यंदाचे हे सर्वात मोठे लग्न आहे. यापूर्वी याच वर्षात सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचे लग्न झाले होते. सध्या दीपवीरचे डेस्टिनेशन वेडिंग एक ट्रेडिंग टॉपिक बनले आहे.

लेक कोमोतील रणवीर, दीपिका शिवाय पाहुणे जिथे थांबले आहेत, तिथले एका दिवसाचे भाडे सुमारे ४०० युरो म्हणजे जवळपास ३३ हजार रूपये आहे. याठिकाणी ७५ खोल्या आहेत. या हिशेबाने एका दिवसासाठी दीपवीर २४ लाखांवर खर्च करणार आहे. एक आठवड्यासाठी दोघांनाही १ कोटी ७३ लाखांवर रक्कम मोजावी लागणार आहे.

मेहंदी सेरेमनीत दीपिका चांगलीच भावूक झाली.हातावर मेहंदी लागताच दीपिका कमालीची भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी रणवीरने तिला सांभाळले आणि दीपिकाच्या ओठांवर पुन्हा हसू फुलले. सोशल मीडियावरच्या दीपवीरच्या फॅन पेजवर याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिल्यानुसार, मेहंदी सेरेमनीत दीपिकाच्या डोळ्यांत अचानक अश्रूंनी गर्दी केली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. यावेळी रणवीर पुढे गेला आणि त्याने अलगद तिचे अश्रू टीपत तिला मिठीत घेतले. रणवीरने मिठीत घेताच दीपिका पुन्हा हसू लागली. दीपिका इमोशनल झाली त्यावेळी शुभा मुद्गल ठुमरीवर परफॉर्म करत होती.

लग्नाचा काढला वीमा

दिल्लीमधल्या एका विमा कंपनीकडून दोघांनी ऑल रिस्क पॉलिसी काढून घेतली आहे. १२ ते १६ नोव्हेंबर या काळात पार पाडणा-या या विवाहसोहळ्याला विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. विमानप्रवास, भूकंप, चोरी, पूर,वादळ, आग यामुळं लग्नात अडथळा आल्यास या विम्याचेसंरक्षण मिळणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email