कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी बंद

 

डोंबिवली- जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिक उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे.

सकाळी आठ ते रात्री आठ अशा बारा तासांसाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली आणि नेतिवली या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये हे काम केले जाणार आहे.‌ त्यामुळे कल्याण पूर्व पश्चिम, डोंबिवली पूर्व पश्चिम, वडवली, शहाड, टिटवाळा या भागांमधील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.