डोंबिवलीतील जलकुंभ बनले मद्यपींचे अड्डे

कल्याण-डोंबिवली शहराला पालिकेच्या जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. पण आज हेच जलकुंभ असुरक्षित झाले आहेत. या ठिकाणी मद्याच्या पार्ट्या झोडल्या जातात. जर एखादी व्यक्ती जलकुंभावर चढली आणि काही अनर्थ घडल्यास कोण जबाबदार. पाण्यात काही टाकल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोकाही पोहचू शकतो. तेव्हा जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक प्राधान्याने नेमण्याची गरज आहे. मैदान, तलाव, स्मशानभूमी आणि बंद असलेली कार्यालये सुरक्षेविना ओस पडली असताना येथील जलकुंभही सुरक्षित नसल्याचे पाहयला मिळते. परिणामी कल्याण डोंबिवली शहरातील बहुतांश जलकुंभ हे मद्यपींचे अड्डे बनले असून याठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्यांवरून याची प्रचिती येते.

हेही वाचा :- डोंबिवलीत १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड

जलकुंभासारख्या मालमत्तांच्या सुरक्षेबाबतीतही केडीएमसी कितपत गंभीर आहे. हेही एकंदरीत वास्तव पाहता स्पष्ट होते. केडीएमसीच्या बहुतांश वास्तू या वापराविना ओस पडल्या आहेत. त्यातच सुरक्षा कर्मचारी नसल्याने तेथील त्या अक्षरश: वाऱ्यावर पडल्या आहेत. त्यात मद्यपींसह गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांचे अड्डे त्याठिकाणी सर्रास सुरू आहेत. हेच चित्र कल्याण डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाºया जलकुंभांच्या बाबतीतही दिसून येते. केडीएमसीची ७८ जलकुंभ आहेत. परंतु यातील बहुतेक जलकुंभ सुरक्षेविना आहेत. याचा फायदा मद्यपींसह गर्दुल्ल्यांकडून सर्रास उठविला जात आहे. कल्याण पूर्वेकडील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण मैदानाजवळीत जलकुंभ तसेच पश्चिमेकडील सुभाष मैदान नजीकचे जलकुंभ असो याठिकाणी मद्यपींचा वावर मोठया प्रमाणावर असतो.

हेही वाचा :- दहावीचा पळालेला विद्यार्थी कल्याण रेल्वे स्टेशनवर सापडला

हेच चित्र डोंबिवली पश्चिमेकडील दोन टाकी आणि देवीचापाडा, रेतीबंदर रोड भागातील जलकुंभाच्या ठिकाणीही दिसून येते. याठिकाणी संरक्षक भिंतींना लावण्यात आलेले गेटही छोटे असल्याने ते निरूपयोगी ठरलेआहे. विशेष बाब म्हणजे देवीचापाडा येथील जलकुंभाच्या परिसराची जागा वाहन पार्किंग म्हणून केली जात आहे. काही पाणीपुरवठा विभागाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. या विभागामार्फत कंत्राटी पध्दतीने सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले असले तरी ते पुरेसे नाहीत. केवळ महत्त्वाच्या जलकुंभांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. काही जलकुंभांच्या ठिकाणी रान मोठया प्रमाणावर वाढले असून काही ठिकाणी कचºयाचे साम्राज्यही पसरले आहे. केडीएमसीचे आपल्याच वास्तूंकडे दुर्लक्ष होत असल्याने या मालमत्तांचे कसे नुकसान होते आहे, ते दिसते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email