देशातल्या प्रमुख ९१ धरणातल्या पाणी साठ्यात २ टक्क्यांनी घट

नवी दिल्ली, दि.०७ – डिसेंबरला ६ रोजी संपलेल्या आठवड्यात देशातल्या प्रमुख ९१ धरणात ९४.९९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्‍ध आहे. या धरणाच्या एकूण क्षमतेच्या ५९ टक्के इतका हा पाणीसाठा आहे. २९ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात हा पाणीसाठा ६१ टक्के होता.

हेही वाचा :- शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारी एलईडी व्हॅन फिरणार गावोगावी

या ९१ धरणांची एकूण पाणी साठवणूक क्षमता १६१.९९३ दशलक्ष घनमीटर आहे. पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश आहे. या अंतर्गत २७ धरणे असून त्यांची जिवंत पाणीसाठा क्षमता ३१.२६ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणात १४.०५ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात हा पाणीसाठा ६१ टक्के होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email