बारवी धारणाचे पाणी सोडल्याने डोंबिवली आयरे भागात पाणी घुसले

डोंबिवली दि.०८ – गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा परिणाम अनेक भागासह डोंबिवलीतील आयरे, कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव ठाकूरवाडी, ठाकुर्ली परिसरालाही बसला आहे. त्यामुळे खाडी किनारी भाग जलमय झाला असून पोलिसानी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात येत आहेत.

हेही वाचा :- डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचे प्लास्टर पडून भाडेकरूंचा मृत्यू

यामुळे महावितरण कपंनीच्या ट्रान्सफार्म मध्ये पाणी घुसून रहिवाश्याना त्रास होऊ नये म्हणून माजी नगरसेवक रवी मट्या पाटील यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली सुमारे 400 लोकांना बोटीतून बाहेर काढून पुरातून सुटका केली. दोन दिवस पावसाने कल्याण डोंबिवलीला झोडपून काढले असून सखल भाग जलमय झाला होता. मात्र दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Heavy Rain Disturbed the Life Of Thanekar,
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email