काही बोलायचे आहे पण आत्ता बोलणार नाही – राज ठाकरे यांच्या ‘ट्विट’मुळे विविध तर्क- वितर्क

काहीही भाष्य न करण्याची मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई-महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घटनांवर/ विषयावर तत्काळ प्रतिक्रिया देणाऱ्या राज ठाकरे यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या विषयावर मात्र तात्पुरते मौन धारण केले आहे. तसेच पदाधिकाऱ्यांनीही या विषयावर सामाजिक माध्यमांतून भाष्य करू नये अशी सूचनाही ‘ट्विटद्वारे’ केली आहे. राज ठाकरे यांच्या या ‘ट्विट’ मुळे विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राज ठाकरे हे कोणत्याही विषयावर ‘मार्मिक’ प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपली प्रतिक्रिया किंवा आपले म्हणणे ते प्रसिद्धी पत्रकाद्वारे, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा समाजमाध्यमांतून व्यक्त करत असतात.

निवडणूक चिन्हांचा रंजक प्रवास – शेखर जोशी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यावरून झालेला वाद, मराठा आरक्षण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेगवेगळी विधाने, महाविकास आघाडीचा कारभार ते अलिकडेच ‘पी एफ आय’ संघटनेवर घातलेली बंदी, पुण्यात दिल्या गेलेल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा किंवा फॉस्कॉन वेदांत प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे असो, प्रत्येक घटनेवर राज ठाकरे व्यक्त झाले होते. त्यांनी त्या त्या विषयाचा खास राज ठाकरे शैलीत समाचार घेतला होता.

शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठविण्यात आल्यानंतर तसेच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही असे सांगितल्यानंतर समाज माध्यमांतून या विषयावर उलट सुलट चर्चा सुरू झाली. विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले.

मुंबईतील दोन लाखांहून अधिक दुकानांवर मराठी पाट्या नाहीत – बृहन्मुंबई महापालिकेची सोमवारपासून कारवाई

या निर्णयावर ‘मनसे’ अध्यक्ष या नात्याने राज ठाकरे यांनी तातडीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र त्याचवेळी समाज माध्यमात वेळोवेळी प्रतिक्रिया देण्यासाठी आघाडीवर असलेल्या काही मनसे पदाधिकाऱ्यांनी या विषयावर आपली मते, प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यंदा दिवाळीत ‘हर हर महादेव’! चित्रपटाची झलक सादर

राज ठाकरे यांनी या सगळ्याची दखल घेऊन ‘सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. या सगळ्यावर मी योग्य वेळेस पक्षाची भूमिका मांडेन’ असे ट्विटद्वारे सर्वांना आवाहन केले आहे.

भाषण नव्हे वाचन – शेखर जोशी

राज ठाकरे यांनी केलेल्या या आवाहनानंतर समाज माध्यमातून तसेच राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाची चर्चा सुरू झाली आहे, वेगवेगळे तर तर्कवितर्क करण्यात येत आहेत. मनसे स्थापनेपासून पक्षाचा झेंडा बदलणे, आधी मोदींचे कौतुक मग विरोध आणि पुन्हा भाजपच्या जवळ जाणे असो, शरद पवार यांच्या हातात हात देणे आणि नंतर त्यांचा हात सोडणे असो राज ठाकरे यांनी त्या त्या वेळेनुसार आपली राजकीय भूमिका बदलली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का? अशी चर्चा नेहमीच सुरू असते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल, असे विधान केले होते.

त्यांची साद आली तर पाहू, पण त्यांची साद आधी येऊ द्या, असेही शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या त्याची या निमित्ताने आठवण झाली.

खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याची खरी परीक्षा बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीतच होणार आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ चुणूक ठरेल‌‌. त्या निकालावरून कुठलाही अंदाज बांधणे खूप घाईचे ठरेल.

‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठविण्याच्या प्रक्रियेवर राज ठाकरे यांनी तातडीने कोणतीही प्रतिक्रिया न देणे हे भविष्यातील काही वेगळ्या घडामोडींचे सूचक आहे का? ते येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published.