जिल्हा आणि अधिनस्थ न्यायालयांना आता वाईड एरिया नेटवर्क जोडणी

नवी दिल्ली, दि.१० – ई-कोर्ट मिशन मोड प्रोजेक्ट टप्पा-२ (वर्ष २०१५ – १९ ) अंतर्गत, देशभरातील सर्व जिल्हा आणि अधिनस्थ न्यायालयांना वाईड एरिया नेटवर्कने जोडणी आणि विस्तार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्वरित न्याय निपटारा आणि पारदर्शी कार्य तसेच न्यायालयीन माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान नितीचा अवलंब करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय आणि अधिनस्थ न्यायालयांमध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि लोकल एरिया नेटवर्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने १६०८९ जिल्हे आणि अधिनस्थ न्यायालयांमध्ये उपरोक्त सेवा रुजू केली आहे. या प्रतिथयश ई-कोर्ट डब्ल्यूएएन प्रकल्पाचे मूल्य १६७ कोटी रुपये असून २९९२ जिल्हे आणि अधिनस्थ कार्यालयांच्या इमारतींची जोडणी तसेच अंमलबजावणीचे कार्य बीएसएनएलला देण्यात येणार आहे. यामध्ये आतापर्यंत ज्या ५४७ कोर्टांना जोडणी झालेली नाही अशांचाही समावेश आहे.

आतापर्यंत बीएसएनएलने ४५८ अजोडणीकृत जिल्हे आणि अधिनस्थ न्यायालयांचा या ई-कोर्ट प्रकल्पांमध्ये समावेश केला असून यासंदर्भातील अभ्यासपूर्व पाहणी पूर्ण केली आहे. न्यायिक विभागातर्फे दैनंदिन कार्यांचे समन्वयन करण्यात येत असून हा प्रकल्प ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email