वालधुनी परिसराला आता अखंडित वीज कल्याण पश्चिममधून टाकली नवीन केबल
{म.विजय}
कल्याण ०५ :- कल्याण पूर्व भागातील वालधुनी परिसराला अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी ६८ लाख रुपये खर्चातून कल्याणच्या पश्चिम भागातून एक किलोमीटरची केबल नुकतीच टाकण्यात आली आहे. ३ फेब्रुवारी रोजी ही केबल सुरु करण्यात आली असून नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वालधुनी भागात जानेवारी अखेर दोन दिवस काही काळ वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
हेही वाचा :- पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
वालधुनी भागाला उल्हासनगरच्या स्विचिंग स्टेशन नंबर १७ येथून फिडर नंबर दोनद्वारे वीज येते. उल्हासनगरच्या संबंधित इनकमर भागात दुरुस्ती, तांत्रिक बिघाड उदभवल्यास वालधुनीचा वीजपुरवठा पूर्वी बाधित होत असे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कल्याण पश्चिम भागातून केबल टाकणे आवश्यक होते. त्यानुसार कल्याण पूर्व उपविभाग-२ कार्यालयाने ६७ लाख ६९ हजार रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक बनवून कल्याण मंडल-एक कार्यालयाला सादर केले. मंडळ कार्यालयाच्या मंजुरीनुसार काम पूर्ण करण्यात आले.
हेही वाचा :- कबड्डी लोकप्रिय करण्यासाठी उपाययोजना
या पर्यायी व्यवस्थेमुळे वालधुनी परिसराला अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत मिळणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वालधुनी परिसराचा वीजपुरवठा दिनांक ३० व ३१ जानेवारीला दिवसाच्या वेळी कांही काळ बंद ठेवण्यात आला होता. परिसरातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजपुरवठा बंद ठेवण्याबाबतची पूर्वकल्पना ‘एसएमएस’द्वारे देण्यात आली होती.