बारवी धरण प्रकल्पातील पूर्णवसनग्रस्तांची अजून सहा महिने प्रतीक्षा…
डोंबिवली दि.२२ – पाण्याची वाढती मागणी व भविष्यातील गरज लक्षात घेऊन औद्योगिक विकास महामंडळाने १९९८ साली बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ केला. मात्र विविध कारणांमुळे हे काम दोन दशके रखडले होते. आता राज्य शासनानेच हे काम कोणत्याही परिस्थितीत येत्या सहा महिन्यात येत्या पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करुन पाणी पुरवठा वाढवण्याची क्षमता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी व कर्मचारी त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. येत्या जून अखेर धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण होऊन बारवी धरणात ३४०.८६ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे.यामुळे गेली दोन दशके बारवी धरणाचे काम होईन ठाणे जिल्हयाचा पाणी प्रश्न निकाली निघेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :- चोळे येथील चार गुंठे जमिन महिला कल्याण केंद्रासाठी आरक्षित असताना शासनाचा ताबा
डोंबिवली पत्रकार संघाने बारवी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाची पहाणी करण्यासाठी दौर्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता पंडितराव,बारवीचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. बारवी धरणाची उंची वाढवण्यात येत असल्याने तोंडली, मोहघर, व संलग्न पाडे, काचकोळी, कोळेवाडखळ, सुकाळवाडी, मानिवलीया सहा गावातील सुमारे ११६३ लोकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. घर, शाळा, मंदिर रस्ते आदि प्रथमिक सुविधांसह घरटी एका व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून यापैकी ४६७ जणांची नावे अंतिम करण्यात आली असल्याचे अधिकक्ष अभियंता पंडितराव यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यात प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप व इतर सुविधा ही कामे पूर्ण करण्यात येतील असा दावा कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी केला. राज्याच्या जलसंपदा विभागाने बारवी धरणाचे काम पूर्ण होणार हे लक्षात घेऊन वाढीव पाणीसाठयातून १३३.०७ द ल घ मी पाणी वाटप स्थानिक स्वराज्य संस्थाना करण्याचे आदेश दिले आहेत.