मतदान केल आता हस्ताक्षर आणि सहीवरून स्वभावकुंडलीतील गुणदोष जाणून घ्या…
डोंबिवली दि. ३० – मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून सेल्फी पोईड असा फंडा दिसला. त्यामुळे तरुणपिढीला मतदानानंतर आनंद व्यक्त केला होता. आता तर मतदान असेल तर आता हस्ताक्षर आणि सहीवरून स्वभावकुंडलीतील गुणदोष जाणून घ्या अशी डोंबिवलीत प्रथमच नवीन संकल्पना राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या हस्ताक्षर तज्ञ मुग्धा तानपाठक यांनी जाहीर केली आहे. रविवारी ५ मी रोजी सकाळी १० वाजता डोंबिवली पूर्वेकडील श्री गणेश मंदिरातील विनायक सभागृहात ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली जाणार आहे. मतदारांनी मतदान केलेला पुरावा म्हणून साई लावलेलं बोट दाख्वायचे. त्यानंतर मतदाराने हस्ताक्षर आणि सही करून मुग्धा तानपाठक यांच्याकडे द्यायच्या. मतदाराचे हस्ताक्षर आणि सही पाहून सहीवरून स्वभावकुंडलीतील गुणदोषाची माहिती दिली जाणार आहे. तसेच घरातील दोघांनीही मतदान केले असेल त्यांना मेडीटेशन सेशनमध्ये विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९३२२७९९१७१ वर संपर्क साधण्याची विनंती केली आहे.