मुंबई विद्यापीठाच्या ‘सिनेट’साठी येत्या १० सप्टेंबरला मतदान
मुंबई दि.१० :- मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या (सिनेट) निवडणुकीसाठी येत्या १० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युवासेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या चुरशीची लढत होणार आहे.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
या निवडणुकीसाठी विद्यापीठाने पदवीधर मतदार संघातील ९४ हजारांहून अधिक मतदारांची अंतिम यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चातर्फे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन
येत्या १८ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार असून १० सप्टेंबरला मतदान होऊन १३ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१७ मध्ये झालेल्या सिनेट निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी ७० हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी यात वाढ झाली आहे.