साहित्य- सांस्कृतिक

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात काश्मिरच्या दल लेकमधील हाऊसबोटचा देखावा

प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांची रौप्यमहोत्सवी कलाकृती

डोंबिवली दि.१८ :- अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि डोंबिवलीच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यावर्षी काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊस बोटीत विराजमान बाप्पाचा देखावा साकारला जात आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि माजी टिळकनगरवासिय संजय धबडे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणाऱ्या सजावटीचे यंदा य रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

मध्य रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवडा उपक्रमास सुरुवात

काश्मिरी कोरीवकाम केलेली हाऊस बोट तसेच दोन शिकारे आणि सभोवताली केलेला दल सरोवराचा आभास आणि मंद काश्मिरी संगीत यामुळे गणेश भक्तांना काश्मिरच्या दल सरोवरात आल्याचा भास होईल. तसेच तेथील दोन्ही शिकाऱ्यांमध्ये बसून छायाचित्र काढण्याचा मोह आवरणार नाही असे धबडे म्हणाले. माझे बालपण आणि उमेदीचा काळ ज्या टिळकनगरात गेला त्या नगरातील सजावट सलग २५ वर्ष करायला मिळाल्याचा आनंदही आहे.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे, विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुढील अनेक वर्षे बाप्पाची इच्छा असेल तर टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट करण्याची माझी इच्छा आहे असेही संजय धबडे म्हणाले. मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षात मंडळातर्फे ‘हम’ संस्थेला काश्मीरमधील दोन शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यासाठी निधी संकलन‌ करुन देण्याचा मंडळाचा विचार आहे. आणि त्यामुळे काश्मिरशी निगडीत सजावट संकल्पना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *