दहशतवाद्यांची भयावह कटकारस्थाने उधळून लावण्यासाठी बुद्धिमत्ता उपाय शोधण्याचे उपराष्ट्रपतींचे संशोधक समुदाय आणि आयआयटींना आवाहन

कमी उंचीवरून उडणाऱ्या ड्रोनच्या वापराचा संदर्भ देत दहशतवादाच्या विरोधासाठी या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा आयआयटींना उपराष्ट्रपतींचा सल्ला

आयआयटी मद्रास येथे भारतातील पहिल्या थ्रीडी प्रिंटेड हाऊस केंद्राला उपराष्ट्रपतींनी दिली भेट

देशाच्या हिताला बाधा पोहोचविणारी दहशतवाद्यांची भयावह कटकारस्थाने उधळून लावण्यासाठी, बुद्धिमत्ता उपाय शोधण्याचे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी आज संशोधन समुदाय आणि आयआयटी सारख्या संस्थांना केले.

आयआयटी मद्रास येथे भारताच्या पहिल्या थ्रीडी प्रिंट हाऊस केंद्राला भेट दिल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. दहशतवाद हा मानवजातीचा शत्रू असल्याचे नमूद करत  दहशतवाद्यांकडून वापरण्यात येणाऱ्या कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि लष्कराच्या रडारला न सापडणाऱ्या ड्रोनचा त्यांनी संदर्भ दिला.

आयआयटीसारख्या संस्थांनी दहशतवादाच्या विरोधासाठी या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी उपाय शोधण्याचा सल्ला त्यांनी दिला.

तत्पूर्वी, नायडू यांनी आयआयटी मद्रास आणि त्वास्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स या स्टार्ट अपच्या संयुक्त सहकार्याने – भारताच्या पहिल्या थ्रीडी प्रिंट हाऊसच्या प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी या प्रकल्पाच्या चमूची प्रशंसा केला.

तंत्रज्ञानाच्या विकासात्मक प्रगतीवर जोर देत, उपराष्ट्रपतींनी उदयोन्मुख तंत्रज्ञान वाढविण्यासाठी आणि व्यावसायिक व्यवहार्यता साध्य करण्यासाठी ‘उद्योग-संस्था’ भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

नायडू म्हणाले की, थ्रीडी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स सारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा मेळ असलेला हा प्रकल्प चौथ्या औद्योगिक क्रांतीचे संभाव्य फायदे दर्शवितो यात पारंपरिक उत्पादन पद्धती बदलण्याची क्षमता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.