* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कृष्णा यांचे निधन – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कृष्णा यांचे निधन

हैदराबाद दि.१५ :- तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांचे मंगळवारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. तेलुगु चित्रपटांचे सुपरस्टार महेश बाबू यांचे ते वडील होत.

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कृष्णा यांना सोमवारी उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना कृष्णा यांची प्राणज्योत मावळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत अभिनेते कृष्णा यांना
ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. कृष्णा यांच्या निधनाने चित्रपट आणि मनोरंजन सृष्टीची मोठी हानी झाली असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *