ज्येष्ठ अभिनेत्री आणि मुलाखतकार तबस्सुम यांचे निधन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.‌१९ :- ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध मुलाखतकार तबस्सुम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. मुंबई दूरदर्शनवरील ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ या गाजलेल्या कार्यक्रमाच्या त्या मुलाखतकार होत्या.

काही दिवसांपूर्वी तबस्सुम यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.‌ उपचारानंतर त्या घरीही परतल्या होत्या.‌ शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले आणि त्यांची प्राणज्योत मालविली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.

१९४७ मध्ये बालकलाकार म्हणून तबस्सुम यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात झाली. ‘नर्गिस’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ‘बैजू बावरा’ चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’,’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. मुंबई दूरदर्शनवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमाचे सलग २१ वर्षे त्यांनी सूत्रसंचालन केले होते

Leave a Reply

Your email address will not be published.