तितलीची तीव्रता आज संध्याकाळपर्यंत कमी होणार
नवी दिल्ली, दि.११ – तितली चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या पश्चिमेकडे सरकले असून गोपाळपूरपासून 90 कि.मी. अंतरावर तर फुलबानीपासून 60 कि.मी. अंतरावर आहे. पुढल्या 12 तासात ते वायव्येकडे सरकण्याची शक्यता असून दुपारपर्यंत त्याची तीव्रती कमी होईल.
अरबी समुद्रातील पश्चिम मध्य भागातील लुबान हे चक्रीवादळ आग्नेय दिशेकडे सरकले असून ओमानपासून 500 कि.मी. अंतरावर आहे. पुढील चार दिवसात याची तीव्रता वाढणार असून ते येमेन आणि दक्षिण ओमानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
Please follow and like us: