Thane ; कारवाई टाळण्यासाठी वाहनाला स्वत:चेच ‘जॅमर’

ठाणे दि.०८ – वाहतूक विभागाकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालकांनी आता नवी शक्कल लढवली आहे. अनधिकृत ठिकाणी वाहन उभे केल्यानंतर हे चालक स्वत:जवळील ‘जॅमर’ चाकांना लावून खुशाल आपल्या कामाला रवाना होतात. गाडीला ‘जॅमर’ लागल्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या वाहनावर कारवाई झाल्याचे वाटते आणि ते कारवाई करत नाहीत. अशा प्रकारे ‘जॅमर’द्वारे पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक सुरू आहे. अशा खासगी जॅमरची ठाण्यातील गॅरेज दुकानांत सर्रास विक्री सुरू आहे.

हेही वाचा :- कल्याणात माँब लिंचिंग?पाच जनांच्या टोळक्याने एकाला हातपाय बांधून जीवे ठार मारले

ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या शहरांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येने १० लाखांचा आकडा केव्हाच ओलांडला असून ही वाहने उभी करण्यासाठीचे पुरेसे नियोजन मात्र शहरात नाही.  शहरात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहने धावत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत मार्गासह मुख्य मार्गावर नियमावलीनुसार नो पार्किंगची ठिकाणे आणि वेळांचे नियोजन वाहतूक विभागाकडून ठरवण्यात आले आहे. या नो पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केल्यास वाहतूक विभागाकडून जॅमर लावून कारवाई करण्यात येते. वाहतूक विभागाच्या या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालक वाहनाला खासगी जॅमरच लावून वाहन नो पार्किंगमध्ये उभे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kalyan – पत्रीपूल के जाम में फंसी शव यात्रा। परेशान लोग।।

Leave a Reply

Your email address will not be published.