नांदिवलीत १० हेक्टरमध्ये अद्ययावत वाहन चालक चाचणी पथ, संगणकीय वाहन तपासणी केंद्रे उभारणार
(श्रीराम कांदु)
ठाणे दि १०: कल्याण येथील नांदीवली येथे १० हेक्टर जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार झाले असून प्रादेशिक परिवहन विभागातर्फे याठिकाणी अद्ययावत संगणकीय वाहन चालक चाचणी पथ, अद्ययावत संगणकीय वाहन तपासणी केंद्रे देखील उभारण्यात येणार आहे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे जितेंद पाटील यांनी माहिती देतांना सांगितले. या ठिकाणाची पाहणी नुकतीच परिवहन आयुक्त शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दळवी यांनी केली असून शेखर चन्ने यांनी यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सदर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
हेही वाचा :- थंड हवेचे ठिकाण नेरळ ते माथेरानचा प्रवास गारेगार
काय आहे हा ब्रेक टेस्ट ट्रॅक
उच्च न्यायालयाने जनहित याचिका २८\२०१३ मध्ये दिलेल्या आदेश व तदनुषंगाने परिवहन वाहनांच्या तपासणीसाठी २५० मीटर ब्रेक चाचणी पथ शासकीय जागेत उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे. ठाणे जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणावर परिवहन वाहनांची नोंदणी झालेली आहे. रस्ता सुरक्षा हा एक ज्वलंत प्रश्न असुन रस्त्यावरील वाहतुक सुरक्षित ठेवण्यासाठी वाहन तपासणीसाठी व वाहन चाचणी करीत शाश्वत सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक होते. त्यानुसार आरक्षित असलेल्या कल्याण येथील नांदीवलीमध्ये १० हेक्टर जागेवर २५० मी लांबीचे ५ ब्रेक टेस्ट ट्रॅक प्रस्तावित असुन ३ ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार झाले आहेत. उर्वरित २ ब्रेक टेस्ट ट्रॅक १५ डिसेंबर १८ पर्यंत पूर्ण होणार आहेत अशी माहिती जितेंद्र पाटील यांनी दिली. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथील वाहने पासिंगकरिता सध्या या जागी येत आहेत.
हेही वाचा :- `एक घर एक खेळाडू` रिजेंसी संकुलाची संकल्पना….
वाहतूक क्षेत्राला फायदा
त्याचबरोबर वाहन चालकांना समुपदेशनासाठी रस्ता सुरक्षा सभागृह व प्रतिक्षा कक्ष, कार्यालय, पुरूष व महिला यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छालय व पिण्याचे पाण्याची सोय, वाहनांच्या पार्किंगसाठीची सोय इत्यादी अशा अनेक सुविधा याठिकाणी देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे या भागात वाहतुक क्षेत्राशी निगडीत व्यवसायास चालना मिळणार आहे तसेच सध्या सर्वोच्च न्यायालयापुढे जो महत्वाचा प्रश्न आहे त्या रस्ता सुरक्षा विषयक मुलभुत सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिवहन आयुक्तांच्या भेटीच्यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नाईक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री मासूमदार व तहसिलदार अमित सानप इतर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .