डोंबिवली भर उन्हात अवकाळी पावसाची टीपटीप

आज दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी पावणेतीन ते तीनच्या सुमारास डोंबिवलीतील काही भागात अवकाळी पावसाच आगमन झाले. भर उन्हात अचानक काही काळ थोडासा अंधार दिसू लागला व पावसाची संथ अशी टीपटीप सुरू झाली.

थोड्याच वेळात पुन्हा ऊन आले व उन्हाबरोबरच पाऊस पडत असल्याचं चित्र शहरातील काही भागात दिसत होते.काही मिनिटातच अवकाळी पाऊस थांबून पुन्हा ऊन पसरल्याचं शहरात दिसू लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published.