शाश्वत विकासासाठी सर्व राष्ट्रांकडून अभूतपूर्व सहकार्याची गरज

नवी दिल्ली, दि.१२ – अभूतपूर्व प्रमाणात होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सर्व राष्ट्रांना शाश्वत विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले ते पुढे म्हणाले की सर्वसमावेशक विकास हा शाश्वत विकासाच्या केंद्रभागी आहे. त्यामध्ये शाश्वत कृषी, शाश्वत दळणवळण, शाश्वत शहरीकरण, शाश्वत इंधन सुरक्षा तसेच शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि वन्य प्राण्यांचे जतन या गोष्टींचा समावेश होतो आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास परिषद 2019 च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही परिषद दि एनर्जी अंड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट(टेरी) यांनी आयोजित केली आहे. पुढे ते म्हणाले की, भारताच्या परंपरा आणि वैदिक तत्त्वज्ञान यातून शाश्वत दिनचर्या दिसून येते तसेच यातून मानवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते यातून दिसून येते. उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की शाश्वत विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने योगदान देण्याची गरज आहे त्यासाठी आपण आपापल्या परीने आपला खारीचा वाटा उचलू शकतो.

हेही वाचा :- पर्यावरण -हास प्रकरणी उरणचे तहसीलदार व रायगड जिल्हाधिकारी यांना उरण सामाजिक संस्थेने बजावली कायदेशीर नोटिस.

यामध्ये सिग्नलला थांबले असताना इंजिन बंद करणे असो वा कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे असो या गोष्टींचा समावेश होतो. याप्रसंगी प्राचीन भारतीय म्हणीचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले, धर्मो रक्षती रक्षितः म्हणजेच जर तुम्ही योग्य मार्गाचा अवलंब केला तर तुमचे आणि तुमच्या सभोवतालचे आपोआपच संरक्षण होते आणि आपण तसे नाही केले तर आपल्याला धोका संभवतो. नायडू पुढे म्हणाले की पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपण धर्म, वंश, सत्ता यासारख्या बाबींना बाजूला सारून तिच्या रक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. हवामान बदलाचा सरळ प्रभाव हा विकसनशील देशांवर पडतो कारण ते देश ऋतुमानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात असे सांगून ते म्हणाले यासाठी आपण एकत्र प्रयत्न करायला हवेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करून श्री नायडू म्हणाले की भारत हा 175 गिगा वॉट एवढी नवीकरणीय उर्जा तयार करण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि लवकरच भारतातील विजेच्या उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन हे नवीकरणीय स्त्रोतांद्वारे असेल.

हेही वाचा :- स्वच्छ शक्ती 2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन देशभरातल्या महिला सरपंचांचा होणार सत्कार

बायो तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञानाच्या वापराची गरज विशद करताना उपराष्ट्रपती म्हणाले की या तंत्रज्ञानाद्वारे शाश्वत शेती करणे शक्य होईल सेंद्रिय शेती तसेच नैसर्गिक पद्धती चे कीडनाशक यांच्या वापराद्वारे ते शक्य होईल. पर ड्रॉप मोअर क्रॉप सारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांनाही या चळवळीत सहभागी करून घेता येईल असे ते म्हणाले. ग्रामीण भागातून होणाऱ्या अपरिहार्य स्थलांतराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करून ते म्हणाले ही शहरी भागातील गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना आणि संस्थात्मक मदतीची गरज ही तीव्र बनली आहे. नायडू पुढे म्हणाले की कार्यक्षम, उत्पादक, समान, स्मार्ट आणि तग धरू शकणाऱ्या शहरांची निर्मिती ही काळाची गरज बनली आहे यासाठी कचरा विल्हेवाटीचे दीर्घकालीन उपाय त्यांवर लक्ष देण्याची गरज आहे कारण हा कचरा शेवटी आपले जलस्रोत प्रदूषित करत आहे. उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, भारत हा काही मोजक्याच देशांपैकी एक आहे ज्यामध्ये वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच जंगले आणि वन्य प्राणी त्यांची संख्या यामध्येही वाढ होत आहे भारताने चे प्रमाण 21 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे याप्रसंगी विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान आणि पर्यावरण तसेच वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री डॉ. हर्ष प्रधान, श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपती चंद्रिका कुमारतुंगा, मॉरिशिसचे माजी राष्ट्रपती कसाम उतीम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email