दीदींच्या स्वरांकीत भावमुद्रांच्या खास पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते प्रकाशन

उषाताई मंगेशकर आणि राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड आशिष शेलार यांची उपस्थिती

(म विजय )

दीदी अर्थात भारतरत्न लता मंगेशकर… मंगेशीने या देशाला दिलेले स्वरांचे लेणे. भारतीय संगीतात आपले स्थान, आपला स्वर, आपली गाणी आणि आपले अमुल्य योगदान देणा-या दीदींच्या विविध भावमुद्रा ख्यातनाम छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी टिपल्या त्याला स्पंदन आर्ट तर्फे व्ह्ल्युएबल ग्रुपच्या सहयोगाने पुस्तक स्वरूप देण्यात आले. अशा या अप्रकाशित छायाचित्र ठेव्याचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले.

एकाच गायंकाने देशाच्या विविध भाषांमधील असंख्य असंख्य माणसांचे भावविश्व व्यापून टाकले. सामान्यतील सामान्यपासून देशाच्या उच्च पदावर विराजमान झालेल्यांपर्यंत आणि देशाच्या सीमेवरील जवानांपर्यंत प्रत्येक माणसाच्या भावभावनांचा नितांत देखणा आविष्कार गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यातून साकारला आणि त्या भारतरत्न झाल्या. त्यांच्या या संगीतमय जीवन प्रवासातील अनेक क्षण त्यातील भावमुद्रा ख्यातनाम छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी टिपल्या होत्या. अशा अप्रकाशित छायाचित्रांचे पुस्तक स्पंदन आर्ट तर्फे व्ह्ल्युएबल ग्रुपच्या सहयोगाने दीदींच्या ९०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आले. दीदींच्या गाण्यांवर मनस्वी प्रेम करणरे देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शाह यांच्या हस्ते त्यांच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात आज करण्यात आले. यावेळी राज्याचे उषाताई मंगेशकर शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड आशिष शेलार, व्ह्ल्युएबल ग्रुपचे नरेंद्र हेटे, संजय गायकवाड आदी उपस्थिती होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email