प्रत्येक मुलाचे लसीकरण होण्यासाठी ‘युनिसेफ’ने सहकार्य करावे : राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.२६ :- राज्यातील शेवटच्या मुलापर्यंत पोहोचून त्याचे लसीकरण करण्यासाठी ‘युनिसेफ’ महाराष्ट्राने राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. ‘युनिसेफ’ संघटनेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘जगातील लहान मुलांची सद्यस्थिती – २०२३: लसीकरण, प्रत्येक मुलाकरिता’ या अहवालाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. यंदाच्या अहवालाचा मुख्य विषय ‘लसीकरण’ हा आहे.
महापालिकेच्या तरण तलावांमध्ये पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार
युनिसेफ महाराष्ट्राच्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी राजश्री चंद्रशेखर, शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य अधिकारी, पालघर व नाशिक येथील ‘आशा’ सेविका, लाभार्थी मुलांच्या माता तसेच युनिसेफच्या संवाद तज्ज्ञ डॉ स्वाती महापात्रा यावेळी उपस्थित होते. जगात नैसर्गिक आपत्ती वा मनुष्यनिर्मित आपत्ती असो, युद्ध अथवा गृहयुद्ध असो, त्यामध्ये महिला व मुले सर्वाधिक बाधित होतात. गरिबीमुळे देखील अनेक मुले लसीकरणापासून वंचित राहतात.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून मुक्तता – दीपक केसरकर
त्यामुळे युनिसेफने लसीकरणाच्या दृष्टीने उपेक्षित घटकातील मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे राज्यपाल म्हणाले. राज्यात वर्षाला १७.४७ लाख मुले व दिवसाला ४८०० मुले जन्माला येतात. या सर्व नवजात शिशूंचे पूर्णपणे लसीकरण करण्याची व्यवस्था शासनाकडे असल्याचे आरोग्य सचिव नवीन सोना यांनी सांगितले. यावेळी ‘आशा’ सेविका माया विकास पिंपळे, वैशाली पाटील तसेच लसीकरणाच्या झालेल्या लाभार्थ्याची आई उर्मिला ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.