‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेतंर्गत तलाव स्वच्छता मोहिमेसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन

(म विजय)

ठाणे दि.०२ :- नागरिकांनी एकदाच वापर करून फेकून देणाऱ्या प्लास्टीकचा वापर बंद करावा तसेच ठाणे शहर प्लस्टिक मुक्त करावे असा संदेश बाईक रायडर्सच्या माध्यमातून आज देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृतीपर बाईक रॅलीत आरफोरमसी बाईक रायडर्स, महापालिका अधिकारी,कर्मचारी तसेच परिवहन सेवेचे सुमारे 150 हून आधिक बाईकस्वार सहभागी झाले होते. दरम्यान आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्यसाधून ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेतंर्गत पेट रॅली, तलावांची स्वच्छता मोहीम आणि कार्यालय स्वच्छता आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर, उप नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त मारुती गायवकवाड, श्री. देवरे, उप मुख्य लेखापाल प्रदीप मकेश्वर,समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, महिला व बालकल्याण अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारमार्फत ११ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या वेगवेगळ्या भागांत प्लास्टिक बंदीविषयक विविध कार्यक्रम आज राबविण्यात आले.

हेही वाचा :- राज्य सहकारी बँकेतील घोटाळा २५ हजार कोटींचा हे न्यायालयाचे मत

या कार्यक्रमाची सुरुवात मोटार सायकल रॅलीने झाली. ठाणे महानगरपालिका भवन येथून सुरुवात होवून पुढे नितीन जंक्शन – काशीनाथ घाणेकर नाट्यगृह – हॅपी व्हॅली – मानपाडा – कापूरबावडी – तलाव पाळी या मार्गे राम गणेश गडकरी रंगायतन येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. दरम्यान या मोहिमेची सुरुवात महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महात्मा गांधी व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली. यावेळी एकदा वापर करून टाकून देण्यात येणारे प्लास्टिक मी वापरणार नाही. मी स्वतः आणि दुसऱ्यांना सुद्धा प्लास्टिकचा पुनर्वापर जाण्यासाठी प्रोत्साहित करेन आणि आपले ठाणे शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करेन ही आज शपथ घेण्यात आली. शहरातील सर्व घाट, तलावांच्या ठिकाणी सकाळी स्वच्छता रॅली राबविण्यात आली.यामध्ये परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचे संदेश देत रॅली काढण्यात आली. यामध्ये माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्फुर्तपणे सहभाग घेतला. महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीमधील सर्व झोपटपट्टी भागामध्येही प्लास्टिक वापर बंदीबाबतच्या प्रसारासाठी रॅली काढून प्लास्टिक मुक्तीची शपथ घेण्यात आली.

हेही वाचा :- आदित्य ठाकरेंचा भाऊ देखील निवडणूक लढवणार?

 

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व महापालिका शाळा, अनुदानित शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थी देखील या ‘स्वछता हीच सेवा’ या मोहिमेत सहभागी झाले होते, प्लास्टिक वापर टाळा, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, असे नारे देत सर्व शाळेतील विदयार्थी प्लास्टिक वापराबाबतच्या जनजागृती रॅलीत सहभागी झाले. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने स्वामीनारायण सभागृहामध्ये शहरातील डॉक्टरांना टीबी आणि कृष्ठरोग या आजरासंबंधी सातत्यपूर्ण वैद्यकिय शिक्षण आज देण्यात आले. या उपक्रमालादेखील डॉक्टर्स मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. शहरातील रस्त्यावर पडलेले प्लास्टिक बऱ्याच वेळा जनावरे, पाळीव प्राणी खातात. रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या प्लस्टिकमुळे प्राण्यांना होणाऱ्या इजाला आळा बसावा म्हणून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापरू नये तसेच प्लास्टिक रस्त्यावर टाकू नये यासाठी शहरातील प्राणी प्रेमी आपल्या पाळीव कुत्र्यांसोबत या रॅलीत सहभागी झाले.उप आयुक्त मनीष जोशी यांच्या मागर्दर्शनाखाली पशु वैद्यकीय विभाग यांच्या सहकार्याने डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथून या रॅलीला सुरुवात होऊन केवडा सर्कल येथे या पेट रॅलीची सांगता करण्यात आली. दरम्यान शहरातील सर्व नाट्यगृहे, चित्रपटगृहे यामध्येदेखील उपस्थित सर्व नाट्य,चित्रपटप्रेमींना प्लास्टिक वापर करू नये ही शपथ देण्यात आली. तसेच शहरातील गृहसंकुलांनीदेखील या जनजागृतीपर रॅलीत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.