मनाच्या अस्वस्थतेचा उतारा – श्रीनाथ देशपांडे

सवयीप्रमाणे पावणे दहाची नांदेड पॅसेंजर अर्धातास उशीरा असूनही डोळ्यादेखत प्लेटफार्म वरून पुढे सरकताना पाहण्याचे वितुष्ठ आज परत अनुभवले.मग मी कसा वेंधळा,आळशी, वगैरे वगैरे सर्व सोपस्कार मनात पार पडतच राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकात प्रवेश समोरच नांदेड बस आणि मग मनाला पडलेल्या निराशेच्या भागदाडाला all is well केला आणि बसलो शेवटच्या जागे वर जाऊन…

खिडकीत बसायला सारवलेल्या माझ्या आकांक्षेला आधीच एका तोंडावरून बारावी काठावर पास

नव यूवकाने हरताळ फासला. हाडाची काडे,छातीच्या फसळ्या, तोंडामध्ये अपेक्षित तोभरा ,भडक आणि तंग पाश्चात्य कपडे, डोळ्यावर काळाकुट्ट चष्मा, हातामध्ये jio चा नवा 4G चालणारा डब्बा फोन कानात हेडफ़ोन  आणि बसल्यापासून फोनवर पलीकडे असलेल्या टवळी सोबत मेरी जान मेरी जान चे पालुपद, शतजन्माच्या आणाभाका घेणे, तुझ्यात जीव रंगला असल्याचे प्रमाण देणे, ती बोलली नाहीतर हा कसा weed च्याच आहारी जातो त्याचे याची देही याची डोळा सगुण रुपातले दर्शन ….
ह्या त्याच्या weed च्या kick ला मी weed म्हणजे काय हे गुगलले तर त्याचे लक्ष जाऊन त्यानेच ” weed म्हणजे गांजा गांजा ” असे गुगलचा त्रास वाचवण्याचे महत्कार्य केले….

मग तुझ्याशी काडीमोड म्हणजे माझ नशेत स्वतःला वाहून घेणं वगैरे वगैरे वगैरे….
त्या नंतर चालु झाल्या भूताच्या गोष्टी…
वास्तविक हाच स्वतः एक असताना ह्याने दुसऱ्यांनी पाहिलेल्या भूताची का कौतुके सांगावीत हा मला त्या वेळी पडलेला भाबडा प्रश्न…
नंतर स्वतःच्या गमजा मारणे चालू झाले..
आणखी ही असबंध बडबड चालली होती….
असो….

एवढा सगळा लेखन प्रपंच इतक्या थिल्लारासाठी का हा तुमच्या सकट मलाही हळूच पडायला लागलेला प्रश्न….
सांगतो..
हा थिल्लर माझ्या पिढीच्या एका विशेष घटकाचे प्रतिनिधित्व करतो. आयुष्य हे फक्त मजा मारणे शानशौक पूर्ण करणे शरीराच्या रानटी गरजा पूर्ण करणे हेच आहे ह्या पलीकडे काहीही नाही असा यांचा ठाम ग्रह….
जन्मदात्यानी,ज्याला हे “बाप” असे संबोधतात,लाड कौतुकाच्या नावाखाली दिलेल्या स्वातंत्र्याचे स्वैराचार हे करतात…एक विशिष्ठ वय गाठल्यानंतर करायच्या गोष्टी कुतूहलापोटी, पार्श्वभाग स्वच्छ न करता येण्याच्या वयात करून बसतात आणि ह्यांचे हे आकर्षण हळू हळू सवयीत मग लगेच व्यसनात होते…
कुठे राष्ट्राला परमवैभवाला नेण्यासाठी शुभ संकल्पित होणारे कार्यकर्ते घडवण्यासाठी धडपडणारे उच्चविद्याविभूषित पूर्णवेळ प्रचारक ….
हा विरोधाभास मनाला सलतोय….
का करायचं अशा तरुणांमध्ये काम ज्यांना राष्ट्राचे सोडाच स्वतःचे सुध्धा भान नाही. काय गरज ज्यांना आपले स्वैर जीवन निरर्थक होतंय असं वाटतच नाही….
आपण जे काही करतो त्याची लाज सोडा ह्यांना माज वाटतो. आणि ते निर्लज्ज पणे त्याचा माज करतात ही…
हे असं सगळं निराशावादी वातावरणच आपली कामाची प्रेरणा आहे असं मला हळूहळू वाटायला लागलंय. जसे हे समाजात मिरवतात तसे आपण आपल्या कार्याने चांगुलपणाचा,सज्जनतेचा आदर्श उभा करूया.ह्यात सोपं काम असं की तो आदर्श निर्माण करण्याची गरजच नाहीये.ती सज्जन शक्ती समाजात सुप्त अवस्थेत आहे जी नेहमी सुप्तच असते. आपल्या माध्यमातून तिचा आविष्कार समाजापुढे ठेऊया जी समाजात तयार होणाऱ्या कोवळया जीवांना नैतिकता, राष्ट्रभावना,भूतदया, वाडवडीलांचा आदर, मातृशक्तीचा आदर सन्मान ह्या सर्वांचा परिपाठ घालून देणारा आदर्श ठरेल…

नोट – लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email