अनधिकृत बांधकाम पाडले, आता प्रतापगड पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक उभारा

हिंदु जनजागृती समितीची मागणी

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.११ :- गेली अनेक वर्षे न्यायालयाने आदेश देऊनही अफझलखानाच्या कबरी भोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडले गेले नाही. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अफझलखानाच्या कबरीजवळ झालेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास आरंभ केला. आत याच ठिकाणी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमींनी विविध आंदोलने केली. प्रसंगी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, तरी काँग्रेस सरकारांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता महाराष्ट्र शासनाने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास घेतले, यासाठी हिंदु जनजागृती समितीने सरकारचे अभिनंदन केले आहे.

अनधिकृत बांधकाम पाडले, आता प्रतापगड पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक उभारा

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमण होणे म्हणजे मोगलांचे उदात्तिकरण आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान आहे. आज प्रतापगड पायथ्याचे अनधिकृत बांधकाम हटवले जात आहे, याचप्रकारे राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांवर झालेले इस्लामी अतिक्रमण हटवावे, अशीही मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.