* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या ठरावावर उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्याही स्वाक्षऱ्या – सुनील प्रभू – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
राजकीय

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या ठरावावर उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्याही स्वाक्षऱ्या – सुनील प्रभू

मुंबई दि.२४ – तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या ठरावावर आमदार उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे यांनीही माझ्यासमक्ष स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी उलटतपासणीत गुरुवारी केले. शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवारी पुढील सुनावणी झाली.

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रभू यांची उलटतपासणी घेतली. त्यावेळी जेठमलानी यांनी शिवसेनेची २१ जून २०२२ रोजी झालेली विधिमंडळ पक्षाची बैठक, त्यासाठी आमदारांना बजावण्यात आलेला पक्षादेश (व्हीप), तो बजावण्यासाठी अवलंबिण्यात आलेली कार्यपद्धती, व्हीप कोणी व कसे बजावले, कोणते आमदार उपलब्ध झाले आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

पक्षाची बैठक ठाकरे यांच्या वर्षां या निवासस्थानी झाली. त्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. जे आमदार उपलब्ध झाले, त्यांना मी व जे झाले नाहीत, त्यांना मनोज चौगुले या कार्यालयीन कर्मचाऱ्याने पाठविले. ठाकरे यांच्या पािठब्याच्या ठरावावर सामंत, राठोड व भुसे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असे प्रभू यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *